बौद्ध बांधव एकता समिती, नेरुळ तर्फे प.पुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जोशात साजरी
- by Santosh Jadhav
- Apr 15, 2022
बौद्ध बांधव एकता समिती, नेरुळ तर्फे प.पुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जोशात साजरी
नवी मुंबई : स्टेट बँक वसाहत नेरुळ येथे दरवर्षी प्रमाणे यंदा ही बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जोशात साजरी. या प्रसंगी स्तंभ पुष्पहार , पंचशील ध्वजारोहण , धम्मवंदना बौद्धचार्य अशोक कासारे यांचा मार्फत देण्यात आली. या प्रसंगी मिरवणूक व महामानवाची महागाथा हा संगीत कार्यक्रम ही साजरा करण्यात आला
कार्यक्रमास स्टेट बँक अधिकारी संदीप उबाळे, संजय मिश्रा , अनिल गमरे , एसबीआयएसयु मुंबई सर्कल जनरल सेक्रेटरी जगदीश श्रुंगारपुरे व आप नवी मुंबई युवा जिल्हाध्यक्ष चिन्मय गोडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी बाबासाहेबांनी शोषित वर्गासाठी केलेल्या कार्याबद्दल व लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी, फेडरेशन वर्सेस फ्रीडम या पुस्तकांची माहिती श्रोत्यांना देण्यात आली.
कार्यक्रमास सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मंडळाचे अध्यक्ष गोरख कांबळे, उपाध्यक्ष दीपक मोरे, सचिव सिद्धार्थ गमरे, माता रमाई महिला मंडळ व शिल्पकार मित्र मंडळ यांनी मानले
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav