मनसे कार्यकर्त्यानी हनुमान जन्मोउत्सव साजरा करत घणसोली येथे हनुमान मंदिरात महाआरती केलीच
- by Santosh Jadhav
- Apr 16, 2022
मनसे कार्यकर्त्यानी हनुमान जन्मोउत्सव साजरा करत घणसोली येथे हनुमान मंदिरात महाआरती केलीच
नवी मुंबई : कोपरखैरणे - घणसोली मनसे कार्यकर्त्यानी हनुमान जन्मोउत्सव साजरा करत घणसोली येथे हनुमान मंदिरात महाआरती केलीच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख मा. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सरकार भोंगे उतरवत नसेल तर आपल्या ही मंदिरा मध्ये भोंगे अन स्पीकर लावून आरत्या करा याचे पालन करत मनसेकडून उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी घणसोली दर्ग्या समोरील हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते, आदल्या दिवशी रात्री पोलिसांनी १४९ ची नोटीस देऊन देखील मनसेने महाआरती केलीच.
नवी मुंबईचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त , वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच शेकडो पोलिसांच्या पाहऱ्यात महाआरतीला उपस्थित विभाग अध्यक्ष नितीन नाईक, विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे, महिला उपशहर अध्यक्ष सोनाली धनके, शाखा अध्यक्ष प्रवीण हंगे, रोहित सैद इतर पदाधिकारी विशाल डोक, राजेंद्र शेट्टी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav