Breaking News
शिवसेनेने तुर्भे स्टोअर येथे १६ विद्युत पोल बसवले
नवी मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्याकडे तुर्भेस्टोअर , के.के.आर. रस्ता, ड्रम गल्लीतील नागरिकानी विद्युत पोल बसवण्याची मागणी केली होती सुरेश कुलकर्णी यानी नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न काही दिवसात मार्गी लावला असुन हया ठिकाणी सोळा विद्युत पोल बसवण्याचे काम सुरु झाले आहे, त्यामुळे येथील नागरिकानी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचे आभार व्यक्त केले आहे.
हे विद्युत पोल येथे बसवल्यामुळे हया पुढे येथे मोठया प्रमाणात घरफोडी, छेडछानी तसेच अंधारामुळे लोकाना ये - जा करताना अडथळा होणार नाही असे मत रहिवासी राजु साळवे यानी मांडले.
रिपोर्टर