Breaking News
आदिवासीसाठी लवकरच राबवणार पालिका घरकुल योजना शिवसेना नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या प्रयत्ना यश
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका वारली पाडा तुर्भे (एम.आय.डी.सी.) प्रभाग क्रमांक ६९ येथे नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वेक्षण केलेल्या २००१ साली एकुण १५३ आदिवासी कुटुंबासाठी घरकुल योजना राबवणार असल्याचे आश्वासन बुधवारी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यानी शिवसेना मा.नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात खाली भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेने २००० साली (एम.आय.डी.सी.) कडुन सी-४९५ ते सी-५०५ असे एकुण दहा भुखंड आदिवासी कुटुंबाला घरकुल योजना राबवण्यासाठी हस्तांतरण केले आहेत. त्या पैकी दोन भुंखडावर एकुण ५७८०चौ.मीटरवर ३५ आदीवासी कुटुंबासाठी २००३ साली घरकुल योजना राबवली होती त्याचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आर.आर. पाटिल यांच्या हस्ते २००३ साली केले होते.
परंतु ही घरे लहान असल्याने आदिवासी कुटुंबानी ती घेतली नव्हती पण २०१७ साली नगरसेवक सुरेश कुलकर्णी यानी मध्यस्थी करून आदिवासी कुटुंबाना एका घराचे , दोन घर करून व घराचे चौ.मीटर क्षेत्रफळ वाढवून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेला भाग पाडले तसेच आदिवासी कुटुंबानी त्याच्या न्याय हक्कासाठी अनेक मोर्चे, आंदोलन देखील वारलीपाडा गांव बचाव कृती समितीच्या माध्यामातुन केली होती.
पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्णयामुळे जे आदिवासी कुटुंब घरकुल योजने पासुन वंचित होते त्याना देखील घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आदिवासी कुटुंबासाठी राखीव आठ भूखंडावर घरकुल योजनेसह समाज मंदिर , अंगणवाडी , ग्रंथालय , समशान भुमी, खेळाचे मैदान, गार्डन अशा वास्तु पालिकेने उभाराव्यात अशी मागणी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यानी पालिका आयुक्तकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आज आदिवासी कुटुंबानी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचे आभार व्यक्त केले.
आयुक्तांना निवेदन देताना शिवसेना मा. नगरसेवक सुरेश कुलकर्णी , निवृत्त पोलिस अधिकारी दिलीप जगताप व आदिवासी समाजाचे प्रतिनिधि कृष्णा वड, तुळशीराम चौधरीसह शिवसेना नेते केशवलाल मौर्या, देवीदास लगाडे, शिवसेना शाखाप्रमुख भरत कांबळे , राजु कांबळे शिवसेना उपविभाग प्रमुख दिपेश शिंदे , तूर्भे उपविभाग प्रमुख किशोर लोंढे , हनुमान नगर उपविभाग प्रमुख अशोक बांभरे, इंद्रानगरचे शिवसैनिक सौदागर वाघमारे , शिवसेना नेते बाळकृष्ण खोपडे आदी उपस्थित होते.
रिपोर्टर