Breaking News
नवी मुंबईत काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
नवी मुंबई : नवी मुंबई येथे काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली असून स्वलिखित कविता वैभव वऱ्हाङी-९७०२६७५३००, संतोष जाधव-९९२०४१४२९३ यांच्या संपर्क क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे कवींनी आपापल्या कविता पाठवाव्यात. स्पर्धा निशुल्क असून स्पर्धेतून तीन विजेते क्रमांक आणि दोन उत्तेजनार्थ अशी निवड केली जाईल. कविता पाठविण्याची अंतिम मुदत २०जून २०२२ आहे. त्यानंतर आलेल्या कविता ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. तसेच विजेत्या सर्व कवींना मान्यवरांसोबतच्या कविसंमेलनात काव्यवाचनाची संधी देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेचा निकाल २५ जून २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजता, मराठी साहित्य, संस्कृती व कला मंङळ सभागृह सेक्टर-०६, वाशी,नवी मुंबई येथे संपन्न होईल.
रिपोर्टर