Breaking News
वाशी कोपरी पुलासंदर्भात पर्यावरण मंत्र्याशी सर्व पक्षीय बैठक घेत तोडगा काढावा - आप नेते चिन्मय गोडे यांची मागणी
नवी मुंबई : आम आदमी पक्षाने सर्व प्रथम पर्यावरणवादी संघटनासोबत कोपरी पुल व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरामध्ये होऊ घातलेल्या वृक्ष कत्तलीचा विरोध केला होता.
तोच प्रश्न उचलत महाविकास आघाडी मधील प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादीने चिपको आंदोलन केले. विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने त्याच प्रश्नावर मोर्चा काढला
नवी मुंबईतील सर्वच राजकीय आघाड्या या विषयावर विरोध दर्शवत असतील तर यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्र्याशी संयुक्तिक बैठक घेत तोडगा काढावा अशी मागणी आप नवी मुंबई युवा शहर अध्यक्ष चिन्मय गोडे यांनी केली आहे.
रिपोर्टर