Breaking News
रेजिंग डे सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्याकरिता पोलीस ठाणे भेटीचा कार्यक्रम आयोजित
तुर्भे : दि.०३/०१/२०२५ रोजी तुर्भे पोलीस ठाणे येथे एरोस्पेस इंजीनियरिंग कॉलेज, तुर्भे येथील विद्यार्थी यांना पोलीस ठाणे येथे बोलावून पोलीस ठाणेचे कामकाज, पोलिसांकडील शस्त्रास्त्रे याबाबत माहिती देऊन पोलीस ठाणे मधील विविध विभाग यांची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्याना लहान मुलांसंदर्भात होणारे गुन्हे, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, वाहतुकीचे नियम, अंमली पदार्थ विरोधी कायदे याबाबत माहिती करून देण्यात आली तसेच पोलीस हेल्पलाइन नंबर, डायल ११२, सायबर सुरक्षा हेल्पलाइन नंबर १९३० , नवी मुंबई पोलीस व्हाट्सअप चैनल , नवी मुंबई पोलीस यूट्यूब चैनल याबाबत माहिती देऊन फॉलो करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
नमूद कार्यक्रमाचे वेळी पो.नि. (गुन्हे) सतीश चाबुकस्वार, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम नागरे, पोलीस उपनिरीक्षक निलेश कोंडाळकर व गोपनीय अंमलदार यांनी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. सदर वेळी एरोस्पेस इंजीनियरिंग कॉलेजचे ३८ विद्यार्थी, २ शिक्षक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम श्री. आबासाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे पोलीस ठाणे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला असे गोपनीय पोलीस अंमलदार अरुण थोरात यांनी सांगितले.
रिपोर्टर