Breaking News
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; १८ जुलै दिवशी होणार मतदान
नवी दिल्ली : राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानांतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले. भाजपश महा विकास आघाडी सरकारने आपापले उमेदवारही दिले. त्यानंतर आता देशातील सर्वात महत्वाच्या अशा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची नुकतीच घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. पुढील महिन्यात १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे.
सध्याचे राष्ट्रपती असलेले रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लागणार असून केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ जून ते २९ जूनपर्यत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर २ जुलै पर्यत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी संसदेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास ५० टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता.
असा आहे राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम ?
१) नोटिफिकेशन जारी : १५ जून २०२२
2) अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : २९ जून २०२२
रिपोर्टर