Breaking News
शरद पवाराचा बंडखोरांना माघारी फिरण्याचा इशाराच
आमदारांच्या केसाला धक्का लावाल तर घर गाठणं कठीण, राणेंची शरद पवारांना धमकी
मुंबई : आमदारांनी बंड केल्यास कार्यकर्ते त्यांच्यामागे जात नाहीत. शिवसैनिक मात्र कायम नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहतात. बंडखोरांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जीवाचं रान करतात, हा आतापर्यतचा इतिहास आहे, असा उघड उघड इशाराच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना दिला. तसेच गुवाहाटीत बसून बहुमत सिद्ध होत नाही. त्यासाठी मुंबईत या, असंही पवार म्हणाले. पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांना धमकी दिली आहे. आमदारांच्या केसाला धक्का लावाल तर घर गाठणं कठीण होईल, अशा शब्दात राणेंनी पवारांना लक्ष्य केलंय.
एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलंय. मी याआधी अनेक बंड पाहिलेली आहेत. कारण जेव्हा नेता बंड करतो, त्यावेळी कार्यकर्ते त्याच्यामागे जात नाही. छगन भुजबळ जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्याबरोबर ११ ते १५ आमदार होते. त्यानंतर निवडणुका झाल्या. एकटे सोडले तर बाकीचे सगळे पराभूत झाले. त्यामुळे शिंदे यांच्याबरोबरच्या बंडखोरांबाबतीत ही स्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकप्रकारे बंडखोरांना माघारी फिरण्याचा इशाराच दिला.
एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांना उपदेश देताना शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या बंडाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, "मला आठवतंय ज्यावेळी छगन भुजबळ शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. त्यावेळी त्यांच्यासोबत १२ ते १६ आमदार होते. त्यानंतर निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत एकटे सोडले तर बाकी सगळ्यांचा पराभव झाला होता. हा पूर्वीचा अनुभव महाराष्ट्राला आहे. ही स्थिती आताच्या बंडखोरांबाबतीत येऊ शकते, हे नाकारता येत नाही.
रिपोर्टर