Breaking News
एफ.जी.नाईक महाविद्यालयात जल्लोषात गुरू पौर्णिमा साजरी
नवी मुंबई : श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ.जी.नाईक महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यानी शिक्षकांप्रति असलेला आदर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून व्यक्त केला.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रताप महाडिकसर उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षर्केतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक पर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रताप महाडिक यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधत विद्यार्थ्याच्या आयुष्यात गुरुचे स्थान किती महत्त्वाचे आहे तसेच गुरु शिष्य या नात्यावर विविध दाखले देत भाष्य केले व गुरु शिष्य परंपरेला उजाळा देत आजच्या तरुण पिढीने आपल्या जडणघडणीत गुरुचे स्थान किती महत्त्वपूर्ण आहे. हे जाणून घेऊन त्यानुसार आपला व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे याचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील गुरूंना मानवंदना देऊन आपल्या सर्व सहकारी शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यानी सुरेख अशा कार्यक्रमाद्वारे कलात्मक शैलीतून गुरुप्रतीचा असलेला आदर व्यक्त केला त्यांच्या कलागुणांचे कौतुक करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यानी सदर कार्यक्रमांतर्गत गायन, कथा -कथन, वक्तृत्व कलात्मक अविष्कारातून शिक्षकांप्रती असलेला आदर व्यक्त केला, त्याचबरोबर शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आमची जडणघडण कशी यशस्वी होत गेली व ध्येयप्राप्तीपर्यत कसे पोहोचता येईल याविषयीची जाणीव वेळोवेळी आम्हाला करून दिली असे मनोगत व्यक्त केले , तसेच सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले व आदरायुक्त मानवंदना देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अन्वय व्यसनमुक्ती संघटनेच्या अंतर्गत झालेल्या घोषवाक्य लेखन स्पर्धेमध्ये एफ .जी. नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. वैशाली सोळंके हिला द्वितीय क्रमांक कु. ज्ञानेश्वरी आरोटे हिला चौथा क्रमांक तसेच कु.मधुरा खांडे आणि कु. ईशा भोसले हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे त्यांचाही सत्कार सदर कार्यक्रमात प्राचार्य सरांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.गायत्री सोळंके व कु. करिश्मा संकपाळ यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार कु. आदिती पिलाने यांनी मानले.
रिपोर्टर