Breaking News
काय ते रस्ते , काय ते खड्डे , काय ती मनपा आणि काय ते सिडको .. एकदम भकास
नवी मुंबईतल्या रहिवाशी संकुलाजवळील खड्डेमय रस्त्यावर आपने केले वृक्षारोपण
"टक्केवारी खड्डे" बुजवले नाहीत तर एका पावसानं रस्ते उघडणारच
नवी मुंबई : आप नवी मुंबईच्या टीमने आज दुपारी घणसोली येथे नुकत्याच बांधलेल्या सिडको वसाहतीच्या रस्त्यावर चक्क वृक्षारोपण केले, सतत येणाऱ्या वाहनधारकांच्या तक्रारी, रहिवाश्याचे सामाजिक माध्यमावर खड्डे रस्त्याविषयी संताप पाहून , नेते तुपाशी आणि सामान्य जनता खड्ड्याशी असे अधोरेखित करत आपच्या कार्यकर्त्यानी चक्क खड्डे मय झालेल्या रस्त्यावरच वृक्षारोपण करून पालिका प्रशासन आणि सिडको व्यवस्थापनाला आव्हान दिले, रस्ता दुरुस्ती न झाल्यास आम आदमी पक्ष, नवी मुंबई सिडको रहिवाश्याना घेऊन पालिका गाठेल असे नमूद केले. रस्त्यावरील वृक्षारोपणाला नवी मुंबई अध्यक्ष - श्यामभाऊ कदम, अजिंक्य कवठेकर , दत्ताराम सपकाळ, सुनील केदारे, अभिषेक पांडे, सुमित कोटियांन , प्रमोद महाजन, सुभाष कोटियांन आणि घणसोली विभागाचे प्रमुख महेंद्र कनसे यांनी परिश्रम घेतले.
रिपोर्टर