Breaking News
सावधान ! नापतोल कंपनीच्या नावाने ग्राहकांची होतेय फसवणूक
नापतोल ही ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या कंपनीच्या नावाने लकी ड्रॉ कुपन पाठवून आपल्याला लाखो रुपयांचे बक्षीस लागले आहे असे सांगून अनेकांची हजारो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
नापतोल ही ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या कंपनीला बारा वर्ष पुर्ण झाल्याबद्दल कंपनीने निवडक ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन देत आहे. ते कुपन स्क्रच केल्यानंतर लाखो रुपयांचे बक्षीस लागते. बक्षीसाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी बक्षीसाच्या रकमेच्या फक्त एक टक्के रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जाते. ती रक्कम भरल्यानंतर पुन्हा एकदा काही रक्कम भरा असे सांगतात अशा प्रकारे हजारो रुपये आपल्या कडून घेतले जातात. मात्र बक्षीसाची रक्कम काही आपल्याला मिळत नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजते. परंतु आपण याविरोधात कुठेही तक्रार करीत नाही. परिणामी अशा प्रकारे हजारो लोकांची फसवणूक करण्यात आली आहे.
नापतोल सारख्या नामांकित कंपनीच्या नावाने लोकांची फसवणूक होत असल्याचे कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीने
त्यांच्या ग्राहकांना फोन करून अशा फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
रिपोर्टर