Breaking News
वारंवार रस्ते खोदाई टाळण्यासाठी युटिलिटी डक्ट योजनेची अंमलबजावणी करण्याच्या आम आदमी पक्षाच्या पाठ पुराव्याला नवी मुंबईत यश - श्यामभाऊ कदम
आम आदमी पक्षाच्या मागणी प्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका युटिलिटी डक्ट धोरणाची अंमलबजावणी करणार
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते दुरुस्ती वरील उधळपट्टी थांबविण्यासाठी, मल्टि लेयर युटिलिटी डक्टची अंमलबजावणी त्वरित करा. अश्या आशयाचे नम्र निवेदन दिनांक ३ डिसेंबर २०२१ रोजी, आप नवी मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम ह्यांनी पक्षाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर ह्यांना पाठविण्यात आले होते. ह्या नंतर ह्याच विषयावर टीम आप नवी मुंबई तर्फे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर युटिलिटी डक्टच्या मागणीसाठी शांतीपूर्ण धरणे आंदोलन देखील नवी मुंबईचे प्रसिध्द माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आप नवी मुंबईचे बेलापूर वॉर्ड अध्यक्ष सुधीर दाणी ह्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
नवी मुंबई आम आदमी पक्षाच्या मागणीचा विचार करून, भविष्यात प्रत्येक नवीन रस्त्याच्या बांधकामाआधी रस्त्याच्या कडेला युटिलिटी डक्टची व्यवस्था पालिका करेल असे धोरण आखल्याचे शहर अभियंता संजय देसाई ह्यांनी जाहीर केले आहे.
केबल कंत्राटदारांकडून चालू असलेल्या अश्या कायमच्या खड्डे करण्याच्या कामाला , असलेला एकमेव साधा आणि सरळ पर्याय म्हणजे, रस्त्यांचे बांधकाम चालू असतानाच, मल्टि लेयर युटिलिटी डक्टची सुविधा करून ठेवणे. जेणेकरून नवीन केबलिंग किंवा पाईप लाईनसाठी खड्डे खणायची गरजच उरणार नाही. आम आदमी पक्ष नवी मुंबईच्या वतीने वरील अनियमिततेसाठी, अनेक उदाहरणे दाखवून देऊन, फोटो पुराव्यासह निवेदने पालिका आयुक्तांकडे नेहमीच सुपूर्द करण्यात आली होती. आता उशिरा का होईना टीम आप नवी मुंबईच्या पाठपुराव्याला यश येऊन युटिलिटी डक्टचे धोरण जाहीर केल्याबद्दल, नवी मुंबई महानगरपालिका शासनाचे मनपूर्वक आभार
: सुधीर पांडे उपाध्यक्ष आप - नवी मुंबई.
रिपोर्टर