महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर, अंतिम यादी १० डिसेंबरला
- by Santosh Jadhav
- Oct 15, 2025
महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर, अंतिम यादी १० डिसेंबरला प्रसिद्ध होणार
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ ही मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना दिलेल्या यूजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने संबंधित प्राधिकरणांना १४ ऑक्टोबर पासून आयोगाच्या वेबसाईटवरून विधानसभेच्या मतदार याद्या डाऊनलोड करता येणार आहेत.
हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी मुदत
विधानसभेच्या मतदार याद्यांच्या आधारे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारुप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ६ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर हा कालावधी ठेवण्यात आला आहे.
संबंधित नागरिक, राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना या काळात आपली हरकत किंवा दुरुस्तीची सूचना नोंदवता येईल.
अंतिम मतदार यादी
प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय घेऊन २८ नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी जाहीर केली जाईल. तर १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav