Breaking News
निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधीत आदेश
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तयारीला सुरूवात केली आहे. निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधीत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लकवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षापासून रखडल्या आहेत. या निवडणुकांसाठी चार आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात देखील केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहेत.
प्रभाग रचनेची माहिती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाने मागच्या महिन्यात राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने राज्य सरकारला ४ आठवड्यात अधीसूचना जारी करण्यासही सांगितले होते. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया करण्यास सुरूवात केली आहे. प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत , आता प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.
रिपोर्टर