नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाप्रमाणे , स्वच्छता अभियान उपक्रम औद्योगिक विकास महामंडळाने राबवावे - आप , नवी मुंबई
- by Santosh Jadhav
- Sep 28, 2022
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाप्रमाणे , स्वच्छता अभियान उपक्रम औद्योगिक विकास महामंडळाने राबवावे - आप , नवी मुंबई
नवी मुंबई : ऐरोली रेल्वे स्थानकामधील शौचालयाची नियमित स्वच्छता होत नसल्याने, प्रवाश्याना घाण आणि तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबई आम आदमी पक्षाच्या ऐरोलीतील पदाधिकाऱ्यांनी याबाबत ऐरोली स्टेशन मास्टरकडे लेखी तक्रार अर्ज करून वेळोवेळी पाठपुरावा केल्यावर, त्यांना ऐरोली स्टेशन मधील स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थापन हे औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत येते असे सांगण्यात आले.
त्या नंतर, ऐरोली येथील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी देवराम सूर्यवंशी, सरदार कुलविंदरसिंग बिंद्रा आणि नामदेव साबळे यांनी शहर अभियंता औद्योगिक विकास महामंडळ , महापे येथील कार्यालयामध्ये मध्ये जाऊन, औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील सर्वच रेल्वे स्टेशनच्या शौचालयाची स्वच्छता वाऱ्यावर न सोडता, नियमितपणे करण्याची व्यवस्था करत रहावी असा सूचनावजा विनंती अर्ज सुपूर्द केला. महामंडळकडून याबाबत तात्काळ कारवाईची अपेक्षा असल्याचे आम आदमी पक्षाचे पदाधिकारी देवराम सूर्यवंशी यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav