Breaking News
आप , नवी मुंबई तर्फे शहीद भगतसिंग यांची जयंती उत्साहाने साजरी
शहीद भगतसिंग यांनी , वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी, ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, देशासाठी आपले रक्त आणि प्राण दिले. २८ सप्टेंबर रोजी, शहीद भगतसिंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, टीम आप नवी मुंबई आणि आप युवा संघटना तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रेलचेल होती. प्रथम नेरुळ येथे आप - नवी मुंबई उपाध्यक्ष, समाजसेवक, भावी नगरसेवक आणि मर्चट नेव्ही मधून चीफ इंजिनीयर पदावरून निवृत्त झालेले सुधीर पांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये, एका रक्तपेढीच्या सहयोगाने, रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. आप - नवी मुंबईच्या तरुण तरुणींनी रक्तदान करून, उत्साहात भाग घेतला. त्याच प्रमाणे, ऐरोली गुरुद्वारा जवळील आप नवी मुंबई सहसचिव सरदार कुलविंदरसिंग बिंद्रा ह्यांच्या कार्यालयात शहीद भगतसिंग जयंती पण साजरी करण्यात आली.
ह्या सर्वच कार्यक्रमासाठी आप नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे आणि दिघा टीम, सहसचिव डॉ. प्रो. विलास उजगरे-नेरुळ , निवृत्त शासकीय अधिकारी स्नेहा उजगरे-नेरुळ, सहसचिव आणि निवृत्त कामगार आयुक्त देवराम सूर्यवंशी-ऐरोली , नामदेव साबळे -ऐरोली , बेलापूर नोड अध्यक्ष महेश क्षीरसागर, सहसचिव महादेव गायकवाड, निवृत्त सिडको सुपरिटेन्ड इंजिनीयर प्रीतमसिंग धर, निवृत्त सिडको चीफ आर्किटेक्ट रेखा धर ह्यांनी रक्तदान शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. ह्या जयंती दिवसी कुमारी आकृती सोनवणे या युवतीने आम आदमी पार्टीत प्रवेश घेतल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
रिपोर्टर