ऐरोली पोस्ट कार्यालय मधील इंटरनेट सेवेमध्ये सुधारणा हवी - आप नवी मुंबई
- by Santosh Jadhav
- Oct 07, 2022
ऐरोली पोस्ट कार्यालय मधील इंटरनेट सेवेमध्ये सुधारणा हवी - आप नवी मुंबई
नवी मुंबई : सामान्य जनतेसाठी भारतीय पोस्ट कार्यालय सेवा या अत्यंत महत्वाच्या आहेत. गेल्या काही वर्षापासून, पोस्ट कार्यालयाच्या अंतर्गत सजावटींमध्ये भरपूर सुधारणा झाली आहे, त्याच बरोबर संगणकीकरण सुध्दा करण्यात आले आहे. पोस्टल सेवेची आर्थिक प्रोडक्टस पण चांगली आणि नक्कीच सामान्य माणसाला सुरक्षित गुंतवणूक करण्यास विश्वास देणारी आहेत. पण संगणकीकरण करताना, कर्मचाऱ्यांना इंटरनेट स्पीड बद्दल भरपूर समस्या येत असल्याने, पोस्ट कार्यालयात ग्राहक म्हणून येणाऱ्या सामान्य जनतेला, भरपूर अडथळे येत आहेत. त्यामुळे पोस्टातील रांगा भरपूर वाढत असून, सामान्य जणांचा तास तास भर रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. आणि या शुल्लक कारणासाठी, सामान्य माणूस भारतीय पोस्टल सेवेपासून दूर जाऊ शकतो.
त्यामुळे पोस्ट कार्यालय मधील इंटरनेट सेवेच्या स्पीड मध्ये सुधारणा करण्यात यावी, जेष्ठ नागरिकांसाठी सुविधा देण्यात याव्या, पोस्ट कार्यालय मध्ये बसण्याची सुविधा असावी. इत्यादी विनंती करणारे लेखी निवेदन आम आदमी पक्ष नवी मुंबईच्या वतीने, सहसचिव आणि मुख्य कामगार संघटना समन्वयक देवराम सूर्यवंशी यांनी नवी मुंबई विभागीय भारतीय पोस्ट कार्यालय मध्ये दिले आहे .
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav