Breaking News
शिवसेनेवर वर्चस्व दाखवून देण्यात उध्दव ठाकरे यशस्वी ?,अंतरिम प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांनी पक्षविरोधी कारवाया करून स्वतःहून पक्ष सोडला असल्याने ते पक्षाचे सदस्यही राहिलेले नाहीत. शिवसेना या पक्षावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावाच करू शकत नसल्याचे अंतरिम प्रतिज्ञापत्र शिवसेनेच्या वकिलांनी निवडणूक आयोगाला सायंकाळी उशीरा सादर केले आहे.
तसेच २ लाख ६० हजार पक्ष सदस्यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंब्याची प्रतिज्ञापत्र देखील सोबत जोडली असून अजून ३ लाख पक्ष सदस्यांची प्रतिज्ञापत्र जोडणार असून त्यासाठी अजून दोन आठवड्यांचा कालावधी वाढवून मिळावा,अशी विनंती देखील शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच शिवसेनेच्या २८० जणांच्या कार्यकारणीपैकी २०० पेक्षा अधिक जणांच्या पाठिंब्याच्या प्रतिज्ञापत्रांचा यात समावेश असून शिवसेना या पक्षावरचे निर्विवाद वर्चस्व दाखवून देण्यास उध्दव ठाकरे यशस्वी झाले असल्याचे समजते.
ज्या आमदारांवर पक्षविरोधी कारवाया केल्याने कारवाई प्रलंबित आहे. त्यांना पक्षाच्या चिन्हावर दावा करता येणार नसल्याचाही दावा ठाकरेंच्या वकिलांनी आयोगाकडे केला आहे. यामुळे आता आयोग याबाबत काय निर्णय घेणार याकडे शिवसेनेसह सर्वाचे लक्ष लागलं आहे.
रिपोर्टर