Breaking News
धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं, शिवसेना नावालाही बंदी
गेल्या तीन दशकांपासून जे चिन्ह शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलेलं होतं, ते धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटलं आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा तात्पुरता निर्णय देत हे चिन्ह गोठवलं आहे.
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं आहे. शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिवसेना कोण याचा फैसला निवडणूक आयोगाला करता न आल्यामुळे हा अंतरिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून केवळ आगामी निवडणुकापुरता मर्यादित आहे. हा निर्णय बदलला जाऊ शकतो. आता उद्धव ठाकरे कोणतं चिन्हं निवडणार याची उत्सुकता आहे. गेल्या तीन दशकांपासून जे चिन्ह शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलेलं होतं, ते धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटलं आहे.
नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यत आयोगाला पर्याय द्यायचे आहे
रिपोर्टर