३१ ऑक्टोबरपर्यत दाखल करता येतील नवी मुंबई महानगरपालिका प्रारुप विकास योजनेबाबत सूचना / हरकती
- by Santosh Jadhav
- Oct 10, 2022
३१ ऑक्टोबरपर्यत दाखल करता येतील नवी मुंबई महानगरपालिका प्रारुप विकास योजनेबाबत सूचना / हरकती
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची प्रारूप विकास योजना ही महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे याचा उल्लेख “उक्त अधिनियम” असा केलेला असेल) चे कलम २६(१) अन्वये तयार करून जनतेकडून सूचना व हरकती मागविणेसाठी प्रसिद्ध केलेली असून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात व स्थानिक वृत्तपत्रामध्ये दिनांक १०/०८/२०२२ रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तसेच त्याबाबतचे शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २५/०८/२०२२ रोजी व स्थानिक वृत्तपत्रात दिनांक ०२/०९/२०२२ रोजी प्रसिद्ध झालेले आहे.
या अधिनियमातील कलम २६(१) मध्ये नमूद केल्यानुसार सूचना / हरकती दाखल करण्यासाठी निर्धारित कालावधी ६० दिवसांचा आहे. त्यानुसार वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांक ०२/०९/२०२२ रोजीच्या शुध्दीपत्रकापासून सूचना / हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक ३१/१०/२०२२ असा आहे.
याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, नवी मुंबई महानगरपालिका प्रारूप विकास योजनेबाबत काही हरकती / सूचना असल्यास मा.आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे त्या लेखी स्वरूपात पाठवाव्यात. सदर हरकती / सूचना नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुख्य टपाल कक्ष तसेच सहायक संचालक, नगररचना यांचे कार्यालय व सर्व विभाग कार्यालये येथे स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav