Breaking News
रस्त्याच्या कडेला लागवड केलेल्या झाडांवर ठेकेदारांनी फिरवली जेसीबी
उरण : ( विठ्ठल ममताबादे )उरण बोकडवीरा - जेएनपीए बस स्थानक रस़्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेल्या झाडांवर ठेकेदारांनी जेसीबी फिरविल्याची दुदैवी घटना उरण तालुक्यात मंगळवारी ( दि ११) घडली आहे. त्यामुळे प्रवाशी नागरीक व पर्यावरण प्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली आहे.
उरण परिसरात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या परिसरात झपाट्याने प्रदुषण ही वाढत आहे. त्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी उरण - पनवेल या रहदारीच्या रस्त्याच्या कडेला आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी विविध झाडांचे संवर्धन व जतन करण्याचे काम जुनं ते जुलै २०२२ या महिन्यात हाती घेतले.परंतु संबंधित ठेकेदारांनी उरण बोकडविरा - जेएनपीए बस स्थानक रस़्त्याच्या साईट पट्टीवरील वाढलेले गवत जेसीबी मशीने काढण्याचे काम हाती घेतले आहे.परंतु सदर कामात गवता बरोबर नूकताच लागवड करण्यात आलेली झाडे ही जेसीबी मशीनच्या खाली आल्याने प्रवाशी नागरीक व पर्यावरण प्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सध्या उरण करळ - बोकडवीरा रस़्त्यावरील खड्डे भरण्याचे काम व साईट पट्टीवरील वाढलेले गवत काढण्याचे काम ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु सदर रस्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेली झाडे ही आमच्या खात्याची परवानगी न घेता लागवड करण्यात आली आहेत. तरी पण जेसीबी मशीनच्या खाली झाडे आलेली आहेत की नाही याची माहिती नाही. माहिती उपलब्ध झाल्यावर आपणांस कळविण्यात येईल.
नरेश पवार - उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण
उरण तालुक्यातील रस़्त्यांच्या कडेला लागवड करण्यात आलेली झाडे ही उरण वन विभागाच्या माध्यमातून लागवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे वन विभागाला सदर घटनेची माहिती नाही.
- श्री कोकरे वरिष्ठ अधिकारी वन विभाग उरण
उरण तालुक्यातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ठिक ठिकाणी तसेच नागरीकांच्या रहदारीच्या रस्त्याच्या कडेला विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.उरण - जेएनपीए बस स्थानक रस़्त्याच्या कडेच्या जागेवरील लागवड करण्यात आलेली झाडे जेसीबी मशीनच्या खाली तूटली आहेत अशी माहिती मिळाली आहे.त्याचे पंचनामे करण्यात येत आहे.
- सौ.सावंत मँडम वरिष्ठ अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग उरण - पनवेल
रिपोर्टर