मिसेस महाराष्ट्राची उपविजेती ठरली पनवेलची पुनम दलवाडी
- by Santosh Jadhav
- Oct 16, 2022
मिसेस महाराष्ट्राची उपविजेती ठरली पनवेलची पुनम दलवाडी
नवी मुंबई : महिलांना सशक्त बनवणे आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र्य बनवणे हे उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या. तसेच ई अँन्ड सी अभियांत्रिकी युनिव्हर्सिटी मध्ये टॉपर राहिलेल्या आणि आपली मेकअप उद्योजिका म्हणून ओळख निर्माण करून कार्यरत असणाऱ्या पनवेलच्या गृहणी पुनम दलवाडी हिने मिसेस महाराष्ट्राची उपविजेती होत मिसेस ग्लॅमरस हा किताब जिंकला. डायडम मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२२ ही मानाची व नामांकित सौंदर्य स्पर्धा नुकतीच मुंबईच्या सेंट अँड्रू सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेला ज्युरी म्हणून मराठी व हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कामगिरी बजावली. पुनम दलवाडी हिने ही स्पर्धा जिंकल्यावर त्यांच्या कुटुंबियांना व मित्रमंडळींना खूप आनंद झाला. या सौदंर्य स्पर्धेचे उपविजेतेपद जिंकल्यावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला विशेष म्हणजे त्यांचे पती अर्पित दलवाडी यांनी पुष्पगुच्छ देऊन व फटाक्यांची आतिषबाजी करत आपल्या आनंद व्यक्त केला. त्यांना भविष्यात असेच यश प्राप्त करावे अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांच्या सासू भावना दलवाडी व शुभचिंतक रूप लखानी व भावेन लखानी यांनी आनंद व्यक्त करत दिल्यात.
पुनम दलवाडी हिने या स्पर्धेचे उपविजेते पद जिंकल्याने समाधान व्यक्त केले व सांगितले कि " या सौंदर्य स्पर्धेत माझा प्रवासा खूपच उत्तम होता. या स्पर्धेत जिंकण्याचे श्रेय माझ्या कुटुंबियाला व मित्रमंडळींना जाते. भविष्य या माध्यमातून समाजाला काही देता आले तर मी नक्कीच देणार आहे. "मासिक सत्य" या अभियाना मार्फत सॅनेटरी पॅड वाटप व याबाबतची जनजागृती आम्ही करणार आहोत. डायडमच्या अमिषा चौधरी यांनी माझा खूप आत्मविश्वास वाढविला त्याचबरोबर आमचे प्रशिक्षक यांचे मी आभार मानते. भविष्यात माझे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करायचे स्वप्न आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav