Breaking News
सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाचा धिक्कार - आपचे अध्यक्ष - श्यामभाऊ कदम
इ. डी. सरकार काय म्हणतंय, गरिबांना शिक्षण नाही म्हणतंय
आपचे दिल्ली शिक्षण मॉडेल महाराष्ट्रात लागू करा
नवी मुंबई : २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचं धोरण राज्य सरकार पुन्हा एकदा राबवणार असल्याची सुतोवाच स्वतः शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. याचा सर्वात मोठा व दीर्घकालीन फटका ग्रामीण भागातील वंचित, दुर्बल व आदिवासी घटकांना आणि मुख्यत्वे मुलींना बसेल. राज्य सरकारच्या ह्या अन्यायकारक निर्णया विरुध्द , आम आदमी पार्टी तर्फे राज्यभर, मुख्यमंत्री आणि शिक्षण अधिकारी ह्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देऊन निषेध व्यक्त केला जात आहे. नवी मुंबई टीमने देखील ह्या धोरणाविरुध्द शनिवार दिनांक १५ ऑक्टबर रोजी, छत्रपती शिवाजी चौक येथे शांतीपूर्ण निषेध आंदोलन आयोजित केले होते, ज्या मध्ये आप नवी मुंबई आणि पनवेल विभागातील कार्यकर्त्यानी मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली होती.
आपच्या ह्या महाराष्ट्र व्यापी निषेध निवेदन आणि आंदोलनास प्रतिसाद देऊन, राज्य शासनाने हि सरकारी शाळा बंद करण्याची कारवाई त्वरित रद्द करावी, नाहीतर आप - महाराष्ट्र टीमच्या वतीने, मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल ह्याची नोंद शासनाने घ्यावी - संतोष केदारे - युवा अध्यक्ष - आप नवी मुंबई.
शासन, सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय, केवळ पारंपरिक राजकारणातील भ्रष्टाचारी शिक्षणसम्राटाचे हित जपण्यासाठीच घेत आहे. ह्या निर्णयाचा निषेध - देवराम सूर्यवनशी - मुख्य कामगार सन्घटना समन्वयक - आप नवी मुंबई.
एकीकडे महाराष्ट्र शासन, गरिबांच्या शाळा बंद करून, खाजगी शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे, तर दिल्ली आप सरकारने सरकारी शाळा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून उत्कृष्ट मोफत शिक्षणाची सोय करून ठेवली आहे, ज्याचे जगभर कौतुक होत आहे. शासनाने दिल्ली शिक्षण मॉडेलचा अभ्यास करावा - विलास उजगरे - मुख्य शिक्षण प्रणाली समन्वयक - आप , नवी मुंबई.
ह्या आंदोलनास टीम आप दिघा नोड आणि ऐरोली नोड ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. ह्या आंदोलनात उपाध्यक्ष - प्रीती शिंदेकर, मानसी पवार कोपरखैरणे नोड अध्यक्ष अभिषेक पांडे, नीना जोहरी , धनवंती बच्चन, सुनील जाधव, पनवेल जिल्हाअध्यक्ष - जयसिंग शेरे, चिमाजी शिंदे, ठाणे युथ संघटक - चिन्मय गोडे, स्नेहा उजगरे, महादेव गायकवाड, महेश शिरसागर, कौस्तुभ सावंत आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रिपोर्टर