नवी मुंबईतील आम आदमी पक्षाच्या वतीने नवनियुक्त आयुक्तांची सदिच्छा भेट
- by Santosh Jadhav
- Oct 19, 2022
नवी मुंबईतील आम आदमी पक्षाच्या वतीने नवनियुक्त आयुक्तांची सदिच्छा भेट
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेऊन नियुक्ती बद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. आपचे नवी मुंबई अध्यक्ष श्यामभाऊ कदम, उपाध्यक्ष प्रिती शिंदेकर, ठाणे जिल्हा युवा संघटक चिन्मय गोडे, यांच्यासह आपचे पदाधिकारी डॉ विलास उजागरे, देवराम सुर्यवंशी, नीना जोहरी, स्नेहा उजागरे, अभिषेक पांडे, आरती सोनवणे, विजया सुर्यवंशी, धनवंती बच्चन यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.
ह्या भेटी दरम्यान, आम आदमी पक्षाच्या वतीने नवी मुंबई कडून, नवी मुंबईतील कुठल्याही जनताभिमुख कामामध्ये , आमचे कुठलेही राजकारण न करता, सकारत्मक सहकार्य कायम असेल असे आश्वासन देण्यात आले. त्याच प्रमाणे आप नवी मुंबईच्या प्रत्येक वॉर्ड अध्यक्षांकडून प्रत्येक वॉर्डच्या सामान्यजनांच्या तक्रारी, प्रथम वॉर्ड ऑफिस मध्ये पाठपुरावा करून सोडविल्या जातील, पण तेथून निराकरण न झाल्यास, आयुक्तांकडे यावे लागेल असे सांगण्यात आले आणि सहकार्याची विनंती केली.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav