सायली फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत डोळ्याची , मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न
- by Santosh Jadhav
- Oct 19, 2022
सायली फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत डोळ्याची , मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न
तुर्भेस्टोअर विभागातील सामाजिक संस्था सायली फाऊंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, व आरोग्य शिबिरांचे नेहमीच आयोजन करण्यात येत असते . रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, असे अनेक उपक्रम सायली फाऊंडेशनच्या वतीने नेहमी करण्यात येतात. तसेच शंकरा आर झुंजूनवाला आय हॉस्पिटल पनवेल येथे मागील काही महिन्यांत साधारण १५ वृद्ध व्यक्तींचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया व त्यांना जाण्या - आणण्याची सर्व सोय करण्यात आली. यात तुर्भेस्टोअर येथील वृद्ध व्यक्ती ज्यांना मोतीबिंदूचा त्रास होता अश्या व्यक्तींना मोफत स्वरूपात त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी , तुर्भे येथून हॉस्पिटल पर्यंत नेण्यापासून व शस्त्रक्रिया करून पुन्हा घरी आणण्यापर्यंत सर्व जबाबदारी सायली फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आली. सायली फाऊंडेशनच्या अध्यक्षा कु. अंजली अभिमान जगताप यांच्या माध्यमातून या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येते व यापुढेही सायली फाऊंडेशनच्या माध्यमातून जनसेवेसाठी सदैव काम करत राहू असा निर्धार त्यांनी केला आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav