Breaking News
आप नवी मुंबई टीमची, दिल्लीच्या सरकारी शाळेला प्रत्यक्ष भेट
नवी दिल्ली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वप्नातला भारत संविधानाच्या रूपात लिहून ठेवला आहे. आपले संविधान देशातल्या प्रत्येक चिमुकल्याला शिक्षणाचा हक्क देते.
आप नवी मुंबईच्या जिल्हा सहसचिव आणि कोपरखैरणे येथून येणारी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार नीना जोहरी यांनी, दिल्ली येथील सर्वोदय स्कूल या सरकारी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन आपच्या दिल्ली सरकारने घडवलेल्या उत्कृष्ट सरकारी शिक्षण व्यवस्थेबद्दल माहिती करून घेतली.
आप नवी मुंबईचे उपाध्यक्ष आणि सेवानिवृत्त मर्चट नेव्ही चीफ इंजिनियर आणि नेरुळ मधील निवडणूक लढविणारे उमेदवार सुधीर पांडे हे नेरुळ येथे स्वखर्चाने वातानुकूलित कार्यालय बनवून गरजू विध्यार्थ्यासाठी मोफत शिक्षण देत आहेतच.
आम आदमी पार्टीला, नवी मुंबई मध्ये सुद्धा सामान्य जणांकडून दिल्लीकरांसारखा, घवघवीत पाठिंबा मिळाल्यास टीम आप नवी मुंबईत सुध्दा पालिका शाळांमध्ये दिल्लीसारखी शैक्षणिक क्रांती करून दाखविण्यास कटिबध्ध आहे - डॉ. प्रो. विलास उजगरे - मुख्य शिक्षण प्रणाली समन्वयक आणि नेरुळ परिसरात निवडणूक लढविणारे आप नवी मुंबईचे उमेदवार आहेत.
रिपोर्टर