सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार - कामगार नेते महेंद्र घरत
- by Santosh Jadhav
- Nov 26, 2022
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार - कामगार नेते महेंद्र घरत
उरण : ( विठ्ठल ममताबादे ) रोजगार युवा मंच उरण यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै २०२२ रोजी रत्नेश्वरी सभागृह जसखार (उरण ) येथे उरण मधील बेरोजगार तरुण-तरुणीसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्याप्रसंगी जवळजवळ २०० ते २५० बेरोजगार तरुण - तरुणी यांनी सहभाग घेतला व आपले बायोडेटा जमा केले होते. त्यानंतर रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्र शेठ घरत व त्यांचे रोजगार मंचचे पदाधिकारी यांनी पाठपुरावा करून त्या मेळाव्यातील जमा झालेल्या बायोडाटा पैकी आजपर्यंत २७ बेरोजगारांना विविध कंपनीमध्ये नोकरी दिली आहे. तसेच जेएनपीए (जेएनपीटी )पोर्ट मधे नव्याने आलेल्या जे. एम. बक्षी ग्रुपला मेळाव्यातील जमा झालेले सर्व अर्ज सुपूर्द केल्यानंतर दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी बेरोजगारांना ई-मेलच्या माध्यमातून मुलाखतीसाठी कॉल आले होते.या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच ज्यांना नोकरी लागली आहे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी आनंदी हॉटेल उरण येथे रोजगार आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी प्रमुख मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या शुभहस्ते नोकरी मिळालेल्या तरुण तरुणीचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी रोजगार युवा मंच उरणचे पदाधिकारी, किरीट पाटील,डॉ. मनिष पाटील,प्रकाश पाटील,रोहित घरत,कमलाकर घरत, जयवंत पाटील,संजय ठाकूर, के. डी कोळी, नंदा कोळी, सदानंद पाटील,निर्मला पाटील, लंकेश ठाकूर , हेमंत ठाकूर,चेतन पाटील,भालचंद्र नाखवा, प्रांजल भोईर,अजित ठाकूर, योगानंद म्हात्रे, विवेक म्हात्रे, आनंद ठाकूर, राजेंद्र भगत, आदित्य घरत, योगेश रसाळ, आदी उपस्थित होते.तसेच बेरोजगार तरुण-तरुणी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उरण मधील बेरोजगार तरुण-तरुणी यांच्यासाठी मी व युवा रोजगार मंच प्रामाणिक पणे काम करून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचा काम करणार आहोत.जास्तीत जास्त बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले. उपस्थित बेरोजगार उमेदवार तसेच पालक वर्गानी महेंद्रशेठ घरत व रोजगार युवा मंचचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav