करिअर कौन्सलिंग कार्यक्रमाचे आयोजन
- by Santosh Jadhav
- Nov 26, 2022
करिअर कौन्सलिंग कार्यक्रमाचे आयोजन
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील एफ. जी.नाईक महाविद्यालय आणि रा.फ. नाईक कनिष्ठ महाविद्यालय तसेच ऑल इंडिया चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने "करिअर कौन्सलिंग " या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमास एफ.जी.नाईक महाविद्यालय तसेच रा.फ.नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील ५०० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाप्रसंगी श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार मा. संदीप नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये नवी मुंबईत महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी विविध क्षेत्रातील करियर संबंधित विद्यार्थ्याना माहिती व्हावी या अनुषंगाने कौन्सिलिंग कार्यक्रमाची सुरुवात एफ.जी.नाईक महाविद्यालय व रा.फ.नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपासून केली असून नवी मुंबईत येऊ घातलेल्या आणि भविष्यात येणाऱ्या उद्योग व्यवसायांमध्ये नवी मुंबईतील विद्यार्थ्यासाठी करियर संधी उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने माहिती दिली. सदर कार्यक्रमास इंडिया चार्टर्ड अकांउटंट असोसिएशनचे प्रादेशिक संचालक संजय निकम त्याचप्रमाणे सीए अभिषेक शहा, सीए सौ. रमा रंगाचारी हे उपस्थित होते.
संजय निकम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भारतातील सीए क्षेत्रामध्ये करिअरच्या असणाऱ्या संधी त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणारे घटक इत्यादी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . त्याचबरोबर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यानी अधिकाधिक परिश्रम करून सीए सारख्या क्षेत्रात पदार्पण करावे अशी इच्छा व्यक्त केली तसेच सीए सौ. रमा रंगचारी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सीए करतानाची पूर्वतयारी त्याचबरोबर त्यातून मिळणारे लाभ यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सीए मार्गदर्शनाबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कशा रीतीने मदत करता येईल याविषयी चर्चा केली.
सदर कार्यक्रमास एफ.जी.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, रा.फ.नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर थळे, उपप्राचार्य नरेंद्र म्हात्रे, समन्वयक प़ा. रवींद्र पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एफ.जी. नाईक महाविद्यालयाच्या प्रा. सौ. जयश्री दहाट यांनी केले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav