Breaking News
आरपीआय शाखेच्या वतीने भारतीय संविधान दिन व समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले - अभिमान जगताप
नवी मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुर्भे स्टोअरच्या वतीने आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ संविधान दिनाचे औचित्य साधून सकाळी १० वाजता नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १११ व समता विद्यालय आणि नवजीवन हिंदी हायस्कूल या शाळेमध्ये जाऊन त्या शाळेतील मुख्याध्यापकांना भारतीय संविधानाची प्रत देऊन शाळेतील विद्यार्थ्याना संविधानाची प्रस्तावना वाचून त्याचे महत्त्व समजावून सांगितले.
दुपारी २ ते ६ वाजेपर्यत आरपीआय शाखा तुर्भे स्टोअर येथील कार्यालयासमोर "महिमा ख्रिश्चन फेलोशिप" यांच्या सहकार्याने व "डॉक्टर संकेत डुकरे" यांच्याकडून बॉडी चेकअप आणि मोफत मेडिसिन देण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी सिद्राम ओहोळ प्रदेश उपाध्यक्ष व प्रभारी नवी मुंबई , बाळासाहेब मिरजे प्रदेश अध्यक्ष मराठा आघाडी , शीलाताई बोधडे महिला आघाडी अध्यक्ष नवी मुंबई , ॲड. यशपाल ओहोळ ठाणे लोकसभा अध्यक्ष
नागेश कांबळे जेष्ठ उपाध्यक्ष नवी मुंबई , अभिनंदन जगताप शाखा संघटक, तुर्भे स्टोअर , सुशांत ओहोळ, आकाश गवई, दयानंद जानराव, दयानंद जगताप , सागर सरवदे, प्रेमानंद ओहोळ, राहुल साबळे, परेश माने, दादा गायकवाड, प्रशांत जगताप, शुभम लंबे, समीर सरवदे, संदीप कदम, शैलेश जगताप, अथर्व जगताप, अमोल नागटिळक, हितेश निकम, प्रकाश जवरे, रितिक सादरे , सुदाम वाघमारे, सुखदेव गवळी असे अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तर्फे तुर्भे स्टोअर शाखा अध्यक्ष अभिमान जगताप यांनी माहिती दिली व सर्वाचे आभार मानले.
रिपोर्टर