Breaking News
एस आर ए योजनेसाठी नवी नियमावली
नागपूर : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला गती देण्यासाठी नवीन नियमावली येत्या तीन महिन्यांत तयार केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, याबाबतच्या लक्षवेधी वर ते बोलत होते, माधुरी मिसाळ यांनी ती उपस्थित केली होती.
प्रस्तावित नियमावली मध्ये सत्तर टक्के ऐवजी ५१ टक्के झोपडीधारकांची संमती , प्रती हेक्टरी घनता ३६० वरून ४५० करणे , चटई क्षेत्र निर्देशांक किमान चार करणे , नवीन इमारतीची उंची चाळीस वरून पन्नास मीटर करणे असे प्रमुख बदल करण्यात येणार आहेत.
नियमावली मध्ये एकूण पंचवीस बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत, त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या, त्यात तीनशे हरकती सूचना प्राप्त झाल्या असल्याचे फडणवीस म्हणाले. दरम्यानच्या काळात झोपडट्टीवासीयांना २६९ चौ फूट ऐवजी ३०० फुटांचे घर देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले
रिपोर्टर