Breaking News
इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी देशभरातील शेकडो स्पर्धक सज्ज
देशासाठी सुवर्णपदक जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस
नृत्याची ऑलंपिक म्हणून ओळख असणाऱ्या इंडियन हीप हॉप डान्स चॅम्पियनशिपची अंतिम फेरी शनिवारी
मुंबई : पाच दिवसीय इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिपची अंतिम फेरी शनिवारी ७ जानेवारी २०२३ रोजी घाटकोपर येथील पोलीस हॉकी ग्राउंड वर संपन्न होणार आहे. गेली अकरा वर्षे ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाते. या स्पर्धेत जिंकलेले स्पर्धक भारताचे प्रतिनिधित्व जागतिक पातळीवर करतात म्हणून या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे . ही स्पर्धा जागतिक पातळीवर पंचावन्न देशात संपन्न होते व जागतिक अंतिम फेरी फिनिक्स, ॲरिझोना अमेरिका येथे आयोजित करण्यात येते. आतापर्यंत भारताने या स्पर्धेत दोनदा अनुक्रमे २०१५ व २०२२ या दोन वर्षी कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे .
भारतात वीस शहरात प्राथमिक फेऱ्या आयोजित करण्यात आल्या ज्यामध्ये पंचवीस हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला . त्यामधून चार हजार स्पर्धक निवडण्यात आले हे चार हजार स्पर्धक या पाच दिवस चालणाऱ्या नृत्याच्या महोत्सवात स्वतःला सिद्ध करतील. यामधील सर्वोत्कृष्ट चारशे स्पर्धकांना परीक्षक अंतिम फेरीसाठी निवडतील. जी ७ जानेवारी २०२३ रोजी घाटकोपर येथे संपन्न होणार आहे.
ही स्पर्धा जागतिक पातळीवर वीस वर्षांपूर्वी सुरू झाली व या स्पर्धेचे परीक्षण ऑस्ट्रिया, युके, हंगेरी व भारतातील जाणकार सुप्रसिद्ध प्रशिक्षक करतात. ही स्पर्धा अशाप्रकारे बनवण्यात आली आहे ज्यामध्ये प्रत्येक देशातील स्पर्धक आपल्या देशाच्या नृत्य प्रकाराबरोबर हिप हॉप स्टाईलने सादर करतात. या स्पर्धेचे स्वरूप हे पंचावन्न देशात एकाच प्रकारचे असल्याने या स्पर्धेला नृत्याचे ऑलिम्पिक म्हणून कीर्ती प्राप्त झाली आहे. या स्पर्धेचा लौकिक म्हणजे यामध्ये स्पर्धकांची आर्थिक परिस्थिती व कोणत्याच प्रकारची पार्श्वभूमी न बघता सहभाग घेता येतो.
इंडियन हीप हॉप चॅम्पियनशिपचे प्रणेते म्हणून ज्यांची ओळख आहे व ज्यांनी ही स्पर्धा २००८ पासून भारतात आयोजित केली. असे अंजान शिवकुमार यांनी या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की जेव्हा ही स्पर्धा आम्ही भारतात सुरू केली तेव्हा हीप हॉप प्रकारातील स्पर्धकांचा जास्त प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. परंतु आतापर्यंतचा अकरा पर्वचा विचार केला तर हे लक्षात येईल आम्ही भारताला हिपहॉप डान्स प्रकारात जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालोत. परंतु आमचे ध्येय हे भारताला सुवर्णपदक मिळवून देणे आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की भारतात खूप प्रतिभावंत स्पर्धक . आम्ही त्यांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सहकार्य करीत आहोत. , ऑगस्ट २०२३ मध्ये संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक मिळवून आम्हाला भारताचे नाव रोशन करायचे आहे .
अंजान शिवकुमार यांच्या विषयी थोडक्यात माहिती..
नृत्य दिग्दर्शक व आंतरराष्ट्रीय हिप हॉप डान्स परवानाधारक प्रशिक्षक अंजान शिवकुमार हे कोरियो कल्चर आंतरराष्ट्रीय डान्स अकॅडमीचे संस्थापक आहेत या अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे नृत्य विषयक अभ्यासक्रम जसे की सीएसटीडी - ऑस्ट्रेलिया व आयडीएएनसीई - यु.के प्रमाणित शिकविले जातात. ऑनलाइन नृत्य शिकणाऱ्यांसाठी त्यांनी 'बुगालू' हा ॲप सुद्धा निर्माण केला आहे. ज्या माध्यमातून सर्वच प्रकारचे नृत्यप्रकार ऑनलाईन शिकता येतात. त्यांचे ध्येय हे नृत्य कला ज्यांच्यामध्ये आहे त्यांना आर्थिक पाठिंबा नसेल किंवा काही अडचण असेल अशांना पाठबळ देणे व त्यांची कला जगासमोर आणणे. हेच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप सातत्यपूर्ण आपले कार्य करीत आहे.
रिपोर्टर