Breaking News
मुक्ताईनगर येथे मा.मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन
दिनांक १० जानेवारी रोजी महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री बेलदार समाज भूषण उपाख्य दादासाहेब मा.सा.कन्नमवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दादासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य बेलदार समाज महासंघटनेचे राज्य अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जानकीरामजी पांडे यांनी दादासाहेब कन्नमवार यांचा राज्याच्या जडणघडणीत केलेल्या कार्याबद्दल समाज बांधवांना माहिती देत भटक्या विमुक्तांच्या पहिले मुख्यमंत्री यांच्या कार्याचा शासनाला विसर पडला असून त्यांच्या कार्याकडे डोळेझाक केले जात असून , दादासाहेब कन्नमवार यांची जयंती शासन पातळीवर साजरी करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी पुढे सांगितले की साहेबांनी वर्धा ऑर्डंस फॅक्टरी सारख्या उभ्या अनेक आयुध निर्माण फॅक्टरी उभ्या करून देशाचे संरक्षण व्यवस्था मजबूत केली व त्यामुळे आपत्ती कारक परिस्थिती उद्भवल्यास उपाय म्हणून आशियातील सर्वात मोठे नागपूर मेडिकल कॉलेजची स्थापना केली, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब , जिजाऊ मासाहेब यांचा इतिहास दादासाहेब कन्नमवार यांनी लिहिला व जिजाऊ साहेबांच्या नावाने भारतातील पहिला साखर कारखाना बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा येथे दादासाहेब कन्नमवार यांनी काढला अशी दादांसाहेबांविषयीची माहिती सांगितली. यावेळी बेलदार समाज महासंघटनेचे कार्यकर्ते जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष घटे, समाधान पांडे, निलेश घटे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश वानखेडे, संदिप मुंढे, मुकेश घटे, गोकुळ कटोने, ओम कुणबिथोप आदी समाज बांधव उपस्थित राहून मोठ्या उत्साहात माजी मुख्यमंत्री उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला .
रिपोर्टर