एफ जी नाईक महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजन
- by Santosh Jadhav
- Jan 14, 2023
एफ जी नाईक महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजन
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाच्या एफ.जी नाईक महाविद्यालय भूगोल विभागाअंतर्गत भूगोल दिनाचे आयोजन करण्यात आले. भूगोल दिन १४ जानेवारी या निमित्ताने प्रासंगिक गेली तीन दशके पूर्ण महाराष्ट्रातील विविध संस्था महाविद्यालय भूगोल दिन साजरा केला जातो. निसर्ग आणि माणूस यांचा पूरक आणि प्रेरक संबंध मांडताना या दिवसाचे महत्व आणि तत्व जाणावे म्हणून सुरुवात १४ जानेवारी १९८८ या रोजी केली. भूगोल महर्षी डॉ. सी.डी देशपांडे यांचा जन्मदिन ही या दिवशी असतो.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पूर्व प्राचार्य मिराज आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज तसेच फार्मर असोसिएट डिन नीट वर्ड सीनियर युनिव्हर्सिटी ,पुणे डॉ. माधुरी कुलकर्णी, एफ.जी नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दत्तात्रय घोडके, भूगोल विषय शिक्षक प्राध्यापिका डॉ. कविता पवार तसेच शिक्षक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी भूगोल विषय प्राध्यापक या नात्याने विद्यार्थ्यांचे संवाद साधला व पर्यावरण स्नेह म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्याचे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी हीरहीरीने भूगोल दिनानिमित्त प्रश्नमंजुषा प्रोग्राम आयोजित प्रतियोगिता आयोजित केली होती.
कला शाखा प्रमुख डॉ. दत्तात्रय घोडके यांनी भूगोल विषयाबद्दल माहिती तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाऊल उचलने खूप महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती सांगून भूगोल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत भूगोल विषयाची माहिती सांगितली त्याचबरोबर भूगोल विषय व इतर विषयाची सलग्न आहे. याची माहिती दिली तसेच विविध सामाजिक प्रश्न संबंधी विद्यार्थ्यांची चर्चा करताना स्त्रीभ्रूणहत्या लोकसंख्या, वाढते प्रदूषण साक्षरता या विषयावर माहिती दिली. भूगोल विषयाशी संबंधित भविष्यातील रोजगाराच्या संधी या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याचबरोबर जागतिक राजकारण, सीमावाद ,जीआयएस, नकाशाचे महत्त्व ,नागरी व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल आणि विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे कौतुक करून जागतिक भूगोल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कविता पवार यांनी केले व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav