Breaking News
विषय : नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघात आम आदमी पक्ष आणि छत्रपती संभाजी महाराज प्रणित स्वराज्य संघटना यांना एकमेकांच्या उमेदवारांना दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी पाठिंबा.
नवी मुंबई : नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघात स्वराज्य संघटनेचे नेते माजी खा. छ्त्रपती संभाजी महाराज आणि आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी एकत्र येऊन एकमेकांच्या अधिकृत उमेदवारांना दुसऱ्या पसंतीची मते देण्यावर सहमती दर्शवली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार ईश्वर पाटील तसेच स्वराज्य संघटेनेचे उमेदवार सुरेश पवार यांना आपापल्या समर्थक मतदारांनी दुसऱ्या पसंतीचे मते देण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज आणि आप राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केले आहे. या कामी स्वराज्य चे महाराष्ट्र प्रवक्ते करण गायकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.
"आजचा हा निर्णय ऐतिहासिक आणि स्वागतार्ह आहे. राज्यातील जातीयवादी शक्तींना दूर करून शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आगामी काळात राज्याच्या राजकारणात नवीन महत्त्वपूर्ण समीकरणे यामुळे निर्माण होतील", अशी प्रतिक्रिया आप राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया आणि राज्य संयोजक रंगा राचूरे यांनी दिली.
रिपोर्टर