नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन
- by Santosh Jadhav
- Feb 06, 2023
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्र श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील युवकांना व्यायामाची आवड निर्माण होऊन ती रुजावी आणि शरीरिक तंदुरुस्तीचे महत्व समजावे याकरिता प्रत्येक वर्षी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ७ फेब्रुवारी २०२३ रोजी नवी मुंबई महानगरपालिका श्रीराज्यस्तरीय व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री अशा दोन गटात स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय स्पर्धेत ५५ , ६९ , ६५ , ७० , ७५ ,८० , ८५ व ९० किलो वरील अशा ८ वजनी गटांमध्ये होणार असुन प्रत्येक वजनीगटात अनुक्रमे ६ क्रमांकास रोख पारितोषिके असणार आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री मध्ये ५०, ५५, ६०, ६५, ७० व ७५ किलो वरील ६ वजनी गटात स्पर्धा होणार असुन प्रत्येक वजनीगटात अनुक्रमे ५ क्रमांकास रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतील नवी मुंबई महापालिका श्री राज्यस्तरीय अंतिम विजेत्यास रु. १.२५ लक्ष, उप विजेत्यास रु.४५ हजार, मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर (राज्यस्तरीय) यास रु. १५ हजार, बेस्ट पोझर (राज्यस्तरीय) यांस रु.१५ हजार आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री अंतिम विजेत्यास रु.५० हजार, उप विजेत्यास रु.२५ हजार असे एकुण ६.५० लक्ष इतकी भरीव रक्कमेचे पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महानगरपालिका श्री राज्यस्तरीय व नवी मुंबई क्षेत्रश्री शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यातील आणि नवी मुंबई शहरातील जास्तीत जास्त शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घ्यावेत असे आवाहन राजेश नार्वेकर, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांनी केलेले आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav