Breaking News
पत्रकार - शशिकांत वारिशे यांच्या हत्येची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रत्नागिरीतील पत्रकार - शशिकांत वारीशे यांच्या हत्येची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. पंढरीनाथ आंबेरकर ज्यांच्या विरोधात वारिशे यांनी लेख लिहिला होता, त्याच आंबेरकर यांनी एसयूव्हीने ४५ वर्षीय वारीशे यांना कोदवली गावात जोरदार टक्कर देऊन ठार केले असा आरोप आहे.
वारिशे यांच्या मेहुण्याने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये अपघातात बाबत वारिशे यांचा खून झाल्याची तक्रार दाखल केली आहे. दोन वर्षापासून पत्रकार - शशिकांत वारिशे हे रिफायनरीबाबत ग्रामस्थांच्या समस्या मांडत होते. गेले दोन दिवस पत्रकार संघटनांनी या हत्येबाबत आवाज बुलंद केल्यानंतर फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. या एसआयटीचे नेतृत्व वरिष्ठ अधिकारी करणार असून सरकारने वारीशे यांच्या मृत्यूचा स्वतंत्र अहवाल मागवला आहे.
“राज्य सरकारने वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्यांवर असे जीवघेणे हल्ले होत असतील, तर ते राज्य प्रशासन आणि पोलिस दलाचा पर्दाफाश करते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही फडणवीस यांना चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली होती.
कसा झाला होता मृत्यू
वारिशे बारसूमध्ये रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (आरआरपीसीएल) च्या स्थापनेशी संबंधित समस्या कव्हर करत होते. ६ फेब्रुवारी रोजी वारिसे हे पेट्रोल पंपाजवळ उभे असताना आंबेरकरने त्याला त्याच्या एसयूव्हीने खाली पाडले. वाहनाने वारिसे यांना अनेक मीटरपर्यंत ओढले, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. एका दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला.
तेल शुद्धीकरण आणि जमिनीच्या व्यवहाराविरोधात लेख लिहिल्यानंतर काही तासांतच त्यांना अपघात झाला, असा आरोप वारिशे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
रिपोर्टर