Breaking News
नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी मंजूर केला सन २०२२-२३ चा सुधारित व सन २०२३-२४ चा मूळ विकासाभिमुख जनसुविधाकारी अर्थसंकल्प
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा सन २०२२-२३ चा सुधारित आणि सन २०२३-२४ चा मूळ अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी मंजूर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र इंगळे यांनी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे तसेच इतर विभागप्रमुखांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकाची प्रत महापालिका आयुक्तांकडे सादर केली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु.१८१६.४१ कोटी व जमा रू. २७०६.३६ कोटी अशी मिळून एकत्रित जमा रु. ४५२२.७७ कोटी आणि रु.३३७७.७४ कोटी खर्चाचे सन २०२२-२३ चे सुधारित अंदाज, तसेच रु.११४५.०३ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह जमा रु. ४९२५ कोटी व रु.४९२२.५० कोटी खर्चाचे आणि रु. २.५० कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन २०२३-२४ चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर व उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर यांनी आयुक्तांकडे सादर केले व मंजूर करण्यात आले.
तसेच नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक वृक्षप्राधिकरण सचिव तथा उद्यान विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर यांनी आयुक्तांकडे सादर केले व तेही मंजूर करण्यात आले.
रिपोर्टर