Breaking News
आपचे पालिका वैद्यकीय सेवांचे सामान्य जनतेच्या अभिप्रायावर आधारित सर्वेक्षण
नवी मुंबई : आम आदमी पक्षाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर - ३ येथील बेसमेंट पार्किंग सर्वसामान्य रुग्णांसाठी सुध्दा खुले करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून आणि ट्विटर ट्रेंडिंग इत्यादी माध्यमामधून आवाज उठविण्यात आला होता. आप नवी मुंबईच्या ह्या प्रयत्नांना यश येऊन हे पार्किंग खुले करण्यात आले.
टीम आप नवी मुंबई हि, आपच्या दिल्ली सरकारने करून दाखवलेली उत्कृष्ट सरकारी आरोग्य सेवांची क्रांती, नवी मुंबईत सुध्दा आणण्यासाठी कटिबद्ध आहे. ऐरोली टीम तर्फे आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ऐरोली डेपोसमोर येणाऱ्या रुग्णांकडून आरोग्य सेवांबाबत समस्या, प्रतिक्रिया, सूचना जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण घेण्यात आले. ह्या सर्वेक्षणास सामान्य रुग्णांकडून स्वाक्षरी सह भरघोस प्रतिसाद लाभला. टीम तर्फे, हि माहिती संकलित करून, रुग्णालय प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येईल.
सामान्य रुग्णांकडून मांडण्यात आलेल्या सूचना, मुख्यत्वे अंशतः आरोग्य सेवा देण्यात येत असल्याने, कोण कोणत्या कारणावरून, गरीब माणसाला खाजगी रुग्णालयात जावे लागते , डॉक्टरांची संख्या कमी असल्याने, गरोदर महिलांना जास्त वेळ बसून राहावे लागणे, डायलेलसीस सुविधा सुधारणा, सोनोग्राफीसाठी लवकर अँपॉईनमेंट न मिळणे, मोतीबिंदू सुविधा , मधुमेह चाचणी, डेंटल सुविधा, वॉशरूम स्वच्छता इत्यादी समस्या होत्या.
ह्या अभियानाला आम आदमी पक्षाचे गोविंद वडकर, प्रीती शिंदेकर, देवराम सूर्यवंशी, आरती सोनावणे, मानसी पवार, देविदास पाटील, कुलविंदरजी, नामदेव साबळे, मिलिंद तांबे, विनोद सिंग, अरुण सोनी इत्यादी कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले.
रिपोर्टर