पोलारीस कंपनी कामगारांचे 3 मार्च रोजी गेट बंद आंदोलन
- by Santosh Jadhav
- Mar 01, 2023
पोलारीस कंपनी कामगारांचे 3 मार्च रोजी गेट बंद आंदोलन
उरण : (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील भेंडखळ येथील पोलारिस लॉजिस्टिक पार्क(सी डब्लू सी ) कंपनीने ५०२ कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे रायगड श्रमिक संघटना तसेच न्यू मेरिटाईम अँण्ड जनरल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली सी डब्लू सी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून ५०२ कामगारांनी सोमवार दि २७ फेब्रुवारी २०२३ पासून साखळी उपोषण सुरु केले आहे. मात्र कंपनी प्रशासनाने अजूनही कोणत्याही मागण्या पूर्ण न केल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सर्वच राजकीय पक्षाचा व ग्रामपंचायतचा या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा असून कंपनी प्रशासनाकडून कोणतेही योग्य ते प्रतिसाद मिळत नसल्याने ५०२ कामगारांनी शुक्रवार दि ३ मार्च २०२३ रोजी पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सी डब्लू सी ) कंपनीचा गेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav