आर.टी.ई. २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सन २०२३-२४
- by Santosh Jadhav
- Mar 02, 2023
आर.टी.ई. २००९ अंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सन २०२३-२४
नवी मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) नुसार सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षाकरीता अल्पसंख्यांक शाळा वगळून मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांध्ये वंचित गटातील व दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना इयत्ता १ ली किंवा पूर्वप्राथमिक वर्गात २५% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.
शासनामार्फत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील दिनांक 1 मार्च २०२३ पासुन पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणेसाठी सुरु करण्यात आले आहे. सदरचे अर्ज दि. १७ मार्च २०२३ पर्यतच भरता येणार आहेत. सदर प्रवेश अर्ज भरणेसाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal ही वेबसाईट देण्यात आलेली आहे. प्रवेश अर्ज भरणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना RTE २५% प्रवेश पोर्टल दिलेल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पालकांना RTE २५% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी nmmcrte25@gmail.com हा ईमेल आयडी तयार करण्यात आला आहे. तसेच अधिक माहीतीसाठी खालीलप्रमाणे गटनिहाय केंद्रसमन्वयक यांचेशी संपर्क करण्यात यावा.
केंद्रसमन्वयक - श्रीम. रेखा पाटील , केंद्र - नेरूळ , तुर्भे , इंदिरानगर मोबाईल क्रमांक - 9870035900
केंद्रसमन्वयक - खुशाल चौधरी , केंद्र - कोपरखैरणे , घणसोली
मोबाईल क्रमांक - 9867922415
केंद्रसमन्वयक - आनंदा गोसावी , केंद्र - कोपरखैरणे , कातकरिपाडा
मोबाईल क्रमांक -9167263035
केंद्रसमन्वयक - श्रीम. सुप्रिया पायरे , केंद्र - ऐरोली , दिघा
मोबाईल क्रमांक - 9819176226
केंद्रसमन्वयक - प्रशांत म्हात्रे
केंद्र - शिरवणे , वाशी
मोबाईल क्रमांक - 9321525288
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav