तुर्भे स्टोअरचे शंकर पडुळकर यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश
- by Santosh Jadhav
- Mar 09, 2023
तुर्भे स्टोअरचे शंकर पडुळकर यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सातत्याने सामाजिक कार्य करणारे शंकर भिमसिंग पडुळकर यांनी कोपरखैरणे येथे आज आम आदमी पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आठ मार्चला आम आदमी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला
शंकर पडूळकर यांनी नवी मुंबई शहरांमध्ये व तुर्भे विभागा मध्ये विविध सामाजिक कामाच्या प्रती काम करून समाजामध्ये चांगल्या प्रतीचे नाव कमावले असून आज आम आदमी पार्टीमध्ये त्यांचा झालेला प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुर्भे विभागात आम आदमी पार्टीचा झेंडा तुर्भे विभागात विविध वार्ड-प्रभागा मध्ये लावणारच हा संकल्प शंकर पडूळकर यांनी बोलून दाखवला यामध्ये अनेक वेळा विविध समाजकार्यातून त्यांनी जोडलेल्या मोठ्या समाज तुर्भे विभागात त्यांच्या प्रवेशानंतर आम आदमी पक्षाशी जोडला जाऊ शकतो असा संकेत आहे. राजकिय विश्लेषकानी दिला आहे. त्यांच्या या प्रवेशावेळी आम आदमी पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ कदम - नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, सुधीर पांडे - नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष, देवराम सूर्यवंशी ऐरोली विधानसभा अध्यक्ष, प्रीती शिंदेकर उपाध्यक्ष नवी मुंबई जिल्हा, चिन्मय गोढे ठाणे जिल्हा संघटक, निना जोहरी नवी मुंबई जिल्हा उपसचिव, प्रीतम धर समन्वयक आम आदमी पार्टी, रेखा धर आम आदमी पार्टी, तुर्भे विभाग अध्यक्ष रमेश गुप्ता तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात महिलावर्गही उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav