Breaking News
रवितनया शर्माने जिंकला मिस नवी मुंबई २०२३ सौंदर्य स्पर्धेचा मुकुट
रवितनया शर्मा ठरली मिस नवी मुंबई बाराव्या पर्वाची विजेती तर पहिली उपविजेती - शायना शिराझी, दुसरी उपविजेती - नेहा वर्मा
नवी मुंबई : मिस नवी मुंबईच्या अकराव्या पर्वाचा अंतिम सोहळा नुकताच वाशी येथील फोर पॉईंट बाय शेरेटॉन हॉटेल मध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला. या वेळी चौदा सौंदर्यवतीनी आपल्या दिलखेच अदानी परीक्षक व प्रेक्षकांना मोहवून टाकले. वेगवेगळ्या तीन फेऱ्या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी मुंबई २०२३ चा ताज रवितनया शर्मा या सोंदर्यवतीने पटकावला. सोबतच दुसऱ्या व तिसऱ्या जागेवर अनुक्रमे शायना शिराझी व नेहा वर्मा हिने बाजी मारली. पारंपारिक राऊंड, वेस्टर्न वेअर राऊंड आणि इव्हनिंग गाऊन राऊंडचे पोशाख अनुक्रमे राजकुमारीने रिचा हावरे, इवा मोडा चे विकास आनंद आणि आयआयडीटी खारघर यांनी डिझाइन केले होते. स्पर्धकांना मार्गदर्शक सिमृती बथिजा - रनवे कोरिओग्राफर आणि पेजेंट ग्रूमिंग एक्स्पर्ट - मिस इंडिया इंटरनॅशनल २०१९ - अभिनेत्री आणि मॉडेल हिने प्रशिक्षित केले. स्पर्धकांच्या चालण्यात अभिजातता आणि शैली जोडली. त्यांचा व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग आणि मेंटल वेलनेस मेंटॉरिंगचे आयोजन मानसशास्त्रज्ञ आणि व्यक्तिमत्व विकास मेंटॉर - इंद्रप्रीत कौर हीने केले.
या सौंदर्य स्पर्धेचे उपशीर्षक विजेत्या ठरल्यात प्रणिता गावंडे - मिस टॅलेंट, शायना शिराझी - मिस बॉडी ब्युटीफुल आणि मिस ग्लोइंग स्किन, सलोनी गोल्लर - मिस ब्युटीफुल आईज, मेघा भोगले - मिस रॅम्प वॉक, मिहिका नायक - मिस फ्रेश फेस, साक्षी विसावे - मिस बेस्ट स्माईल, नेहा वर्मा - मिस फोटोजेनिक , रवितनय शर्मा - मिस स्टाइल आयकॉन , दिया राचलवार - गर्ल ऑफ दि शो, श्रुती काजळे - मिस कॉन्जेनिअलिटी आणि मिस इंटरनेट पॉप्युलर.
परीक्षक म्हणून झोया अफरोज - मिस इंडिया इंटरनॅशनल २०२२, अंकिता खरात -मिस क्वीन ऑफ इंडिया, २०१६ व मिस एशिया रनर-अप, २०१६ , मीना अन्सारी - मिसेस इंडिया युनिव्हर्स, २०१८, संजीव कुमार - एसके बिल्डर्स, अशोक मेहर - शिकारा हॉटेल, अभिजीत नौरकर व्यवस्थापक, द रिसॉर्ट यांनी या सौंदर्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
"या स्पर्धेचे हे बारावे पर्व होते गेली बारा वर्षे या आम्ही स्पर्धेला खंड पडू दिला नाही. या वर्षी चारशे च्या वर मुलींनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदविला आणि यापैकी सर्वच फेरीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या चौदा सौंदर्यवती अंतिम फेरीत गेल्यात. या माध्यमातून आम्ही सामान्य घरातील मुलींना एक व्यासपीठ निर्माण करून देत आहोत ज्या माध्यमातून मनोरंजन व फॅशन क्षेत्रात आमचे स्पर्धक या पूर्वी चमकलेत आणि भविष्यात सुद्धा आपल्या शहराचे नाव रोशन करतील." अशी माहिती आयोजक यू अँड आय एन्टरटेन्टमेंट चे संचालक आणि या स्पर्धेचे आयोजक हरमीत सिंग यांनी दिली. मनमित सिंग यांच्या संन्यास या बँड ने आपल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. विशेष म्हणजे या स्पर्धेची पहिली फेरी लाईव्ह बँड च्या गायनावर सादरीकरण झाले. या बँड मध्ये गायक मनमित सिंग यांना सोहम दोशी(ड्रमर), रोहन जाधव (लीड गिटारिस्ट), हिमांशू आणि गौतम (बास गिटारिस्ट) आणि शुभ कुंडू (कीबोर्ड) या कलाकारांची साथ मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा शेट्टी सेलेब्रिटी होस्ट हिने केले व कार्यक्रमात रंगत भरली.
रिपोर्टर