दिवागाव येथे मस्त्य विक्रेत्यांच्या हक्काच्या जागेसाठी आप नवी मुंबईचे आंदोलन
- by Santosh Jadhav
- Mar 13, 2023
दिवागाव येथे मस्त्य विक्रेत्यांच्या हक्काच्या जागेसाठी आप नवी मुंबईचे आंदोलन
नवी मुंबई : दिवांगाव स्थानिक कोळी बांधव पिढीने मच्छी विक्रेताचे काम करुन त्यांचे पोट पाणी, मुलांचे शिक्षण, जीवन जगणे या व्यवसायावर अवलंबुन आहे. दिवांगाव , सेक्टर ९ ऐरोली सर्कल जवळील हक्काची जागा मिळावी अशी मासे विक्रेंतांची मागणी असून ब-याच वर्षापासून लढाई चालु आहे.
मच्छी विक्रेतांना हक्काची जागा मिळाली पाहिजे, जर हक्काची जागा मिळाली तरच कोळी बांधव जगेल अशी ठाम भूमिका घेऊन आम आदमी पार्टी, नवीमुंबईत ऐरोली दिवागाव , ऐरोली सी सर्कल येथे आंदोलन १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आणि हस्ताक्षर मोहिम राबविण्यात आली.
मासे विक्रेत्यांची ही मागणी पुर्ण व्हावी यासाठी ८० - ९० मच्छी विक्रेतांनी हस्ताक्षर करुन या आंदोलनात समर्थन दिले.
दिवा कोळीवाडा मच्छीमार सेवा संस्थाचे अध्यक्ष चंदन मढवी यांनी यावेळी आम आदमी पार्टी प्रवेश केला. यासाठी प्रिती शिंदेकर, मिलींद तांबे, देवराम सुर्यवंशी, कुलविंदर सिंग बिन्द्रा, नामदेव साबळे,आरती सोनवने, गायत्री तांबे, नीना जोहरी, देविदास पाटील, अरुण सोनी आणि शंकर पाटील परिश्रम घेऊन आंदोलनं केले..
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav