तहसीलदार यांना भेटून आंबेगावातील ग्रामस्थांनी नागरी समस्या मांडल्या , मरणानंतर देखील यातना संपल्या नाहीत
- by Santosh Jadhav
- Mar 20, 2023
तहसीलदार यांना भेटून आंबेगावातील ग्रामस्थांनी नागरी समस्या मांडल्या , मरणानंतर देखील यातना संपल्या नाहीत
आंबेगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरीदेखील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी समाज भौतिक सुविधा पासून वंचित आहे, गोहे येथील बांबळेवाडी येथे आजही मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत, बांबळेवाडीची लोकसंख्या २४७ च्या आसपास आहे, वाडीला लगत गभाले वस्ती, कराळे, करवंदे वस्ती असून तेथेही रस्ता, पाण्यासाठी झगडावे लागत आहे. अनेक वेळा रस्ता व पुल व्हावा अशी ग्रामस्थ यांनी मागणी केली आहे. स्थानिक राजकारणी आणि राजकीय अनास्था आणि इतर उठाठेवी मुळे होऊ शकला नाही. गरोदर माता , रुग्ण यांचे अतोनात हाल होतात. आजही मरण यातना येथील स्थानिक भोगत आहेत. माणसाच्या मरणानंतर पण यातना संपत नाहीत यापेक्षा काय दुर्दैव असेल, पावसाळ्यात पुरामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांचे भवितव्य अंधारात आहे. गॅस सिलेंडर येताना - आणताना डोक्यावर वाहतूक करावी लागते. येथील ग्रामस्थ नातेवाईक तसेच आई - वडिलांच्या अंत्य यात्रा व अंतिम विधी देखील करताना असंख्य अडचणी असल्याचे दिसून आले. तेथील ग्रामपंचायत सदस्य , सरपंच , जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , स्थानिक आमदार , खासदार आणि अधिकारी वर्ग करतो काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. गोहे येथील बांबळेवाडी येथील एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल होत असून स्मशानभूमीपर्यत रस्ता नसल्याकारणाने येथील एका ग्रामस्थाच्या मृत्यू नंतर स्मशानभूमीपर्यत रस्ता नसल्याने अतिशय वाईट अवस्थेमध्ये स्मशानभूमीपर्यत मृत्यू देह पोहोचवण्यास कसरत करावी लागली आहे. हे सर्व वास्तव अत्यंत भयानक असून याकडे लोकप्रतिनिधींनी , अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav