महावितरणची प्रस्तावित दरवाढ रद्द करा : वीज दरवाढी विरोधात आपचे आंदोलन , आपचे निवेदन - श्यामभाऊ कदम
- by Santosh Jadhav
- Mar 28, 2023
महावितरणची प्रस्तावित दरवाढ रद्द करा : वीज दरवाढी विरोधात आपचे आंदोलन , आपचे निवेदन - श्यामभाऊ कदम
नवी मुंबई : महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या विरोधात नवी मुंबईतील आम आदमी पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालय, वाशी-सेक्टर-१७ येथे आंदोलन केले. आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात आज राज्यभर या विरोधात आम आदमी पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देऊ तसेच भारतीय जनता पक्षाकडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर मागच्या दोन वर्षात मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलने केली आहेत. दुसरीकडे दिल्ली राज्यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब राज्यातील मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने सुद्धा दि. १ जुलै पासून ३०० युनिट घरगुती आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे. या वेळेस बोलताना ‘जे इतर राज्यात जमते ते महाराष्ट्रात का शक्य नाही ? असा सवाल आम आदमी पक्षाचे नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम ह्यांचे तर्फे करण्यात आला.
आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही लुट थांबविण्यासाठी आम आदमी पक्ष हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आता भाजप – शिवसेना सरकार आले आहे. त्यामुळे सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी या युती सरकारवर आहे. त्यामुळे राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. व मुख्यमंत्री शिंदे हे खरे शिवसैनिक असल्यामुळे ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी. अशी खोचक टीका आपच्या नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर ह्यांनी केली.
याच बरोबर मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात ‘ वीज कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्यामुळे विजेचे दर जास्ती आहेत, वीज दर कमी राहण्यासाठी वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे, कच्चा माल म्हणजे आयात कोळसा खरेदीमधील कृत्रिम भाववाढ , देशांतर्गत कोळसा खरेदीतील भ्रष्टाचार, संशयास्पद कोळसा धुणे प्रक्रिया आदि बाबींमुळे निर्मिती खर्च फुगत असेल तर त्याची सखोल चौकशी करावी. राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी.’ अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
ह्या प्रस्तावित दरवाढीच्या विरोधातील आंदोलनात आप नवी मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. ह्या मध्ये ऐरोली विभागातून देवराम सूर्यवंशी, नामदेव साबळे, आरती सोनावणे, मानसी पवार, कोपरखैरणे विभागातून नीना जोहरी, डॉली बच्चन वाशी विभागातून महादेव गायकवाड, नेरुळ विभागातून रिठा जॉन, चिन्मय गोडे, जावेद शेख, धर सर, डॉ प्रो विलास उजगरे, स्नेहा उजगरे, महेश क्षीरसागर इत्यादी कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav