सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांची बलुतेदार विकास परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड
- by Santosh Jadhav
- Apr 04, 2023
सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांची बलुतेदार विकास परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड
बीड येथे अखिल भारतीय बलुतेदार अलुतेदार विकास परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत नूतन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीत मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड येथील सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली.
जानकिराम पांडे हे गेली १७ वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. ते सध्या भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंटचे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य बेलदार महासंघटनेचे राज्य अध्यक्ष आहेत. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालया बरोबर विधानभवन तसेच ३१ ऑक्टॉबर २००९ रोजी दिल्लीत संसद भवनावर भव्य यशस्वी मोर्चे काढले आहेत. त्याच बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी भ्रष्टाचारात अडकलेल्या लाचखोर व कामात अनियमितता करणाऱ्या ४० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना निलंबित करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. सर्वसामान्यांसाठी, शोषित पीडित वंचितांसाठी लढणारे आक्रमक सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची राज्यात तसेच राज्याबाहेर देखील ख्याती आहे.
१३ सद्सीय कार्यकरणीत जानकिराम पांडे यांची निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे व बलुतेदार तथा अलुतेदारांचे प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बलुतेदार- अलुतेदार व आदिवासी भटक्या विमुतांच्या मागण्यांसाठी लवकरच ते राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर मुख्यमंत्री तसेच इतर विभागाच्या मंत्र्यांच्या भेटी घेऊन सर्व मागण्या व त्यावरील उपाय सादर करणार असल्याचे सांगितले.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav