Breaking News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त, भारतीय संविधान भेट देण्याचा आपचा अभिनव उपक्रम - श्यामभाऊ कदम
नवी मुंबई : नवी मुंबई आम आदमी पक्षाकडून कुठलाही राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करताना, पारंपरिक म्युझिक, डान्स, डी जे वैगेरे खर्चिक मार्गाना पूर्णपणे वगळून, कार्यक्रम अभिनव आणि जनताभिमुख मार्गाने साजरा करण्यावर भर दिल्या जातो.
या पार्श्वभूमीवर , टीम आप नवी मुंबई तर्फे, या वर्षीची १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, नवी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना संविधानाच्या पुस्तकाची भेट देण्याचा अभिनव उपक्रम सुरु करून साजरी करण्यात आली. तसेच टीम तर्फे, संध्याकाळी ऐरोली येथील बाबासाहेबांच्या स्मारकास भेट पण देण्यात आली. आप नवी मुंबईच्या विविध टीम तर्फे, ऐरोली, दिघा, तुर्भे, कोपरखैरणे, वाशी आणि नेरुळ टीम तर्फे, नवी मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्सना सदिच्छा भेट देऊन, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भारतीय संविधान पुस्तक भेट देण्यात आले.
आदरणीय बाबासाहेबानी लिहिलेले आपल्या देशाचे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देते. पण दुर्देवाने, आज स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्षे उलटून सुध्दा, संविधानाने दिलेल्या ह्या हक्कानं बद्दल म्हणावी तशी जागरूकता जनते मध्ये आलेली नाही. त्याच प्रमाणे, आज काही मूठभर देशविघातक शक्तींकडून जाणून बुजून भारतीय संविधानाची गळचेपी करण्याचे प्रयत्न होत आहेत.
आम आदमी पक्ष हा एक संविधान प्रेमी, धर्म-जाती निरपेक्ष, निस्वार्थी आणि देशप्रेमी सामान्य नागरिकांचे संघटन आहे. संविधान प्रत्येक चिमुकल्याला चांगल्या आणि मोफत शिक्षणाचा हक्क देते. प्रत्येक वयोवृद्धाला चांगल्या मोफत आरोग्य सेवेचा हक्क देते. अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली सरकार हे आपल्या देशातील एकमेव सरकार आहे, ज्यांनी शून्य भ्रष्टाचाराचे कडक धोरण आखून, सरकारी शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून, संविधानाच्या या हक्काचे संरक्षण केले आहे.
ऐरोली दिघा टीम तर्फे देवराम सूर्यवंशी, संतोष केदारे, दिनेश ठाकूर, राहुल पगारे, कर्तव्य पगारे. तुर्भे येथील शंकर पडूळकर आणि टीम कोपरखैरणे टीम सुमित कोटियन, नीना जोहरी, अभिषेक पांडे, राहुल मेहरोलिया , वाशी टीम श्यामभाऊ कदम, डॉ. राकेश शर्मा, यतीन बन्सल, हर्षल राणे, महादेव गायकवाड, सुलोचना शिवानंदन, ॲड. सुवर्णा जोशी, कल्याणी , नेरुळ टीम तर्फे चिन्मय गोडे, डॉ. प्रो. विलास उजगरे, स्नेहा उजगरे, सुधीर पांडे, प्रीतम सिंग, रेखा धर, महेश क्षीरसागर, स्नेहल क्षीरसागर इत्यादी कार्यकर्त्यानी आपआपल्या स्थानिक पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट देऊन भारतीय संविधानाचे पुस्तक भेट दिल्याची माहिती आम आदमी पक्ष नवीन मुंबई जिल्हा अध्यक्ष - श्यामभाऊ कदम यांनी दिली.
रिपोर्टर