Breaking News
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना आपचे शंकर पडुळकर यांनी भारतीय संविधानाची पुस्तिका भेट
तुर्भे : आम आदमी पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ कदम यांच्या सूचनेनुसार तसेच तुर्भे नोड उपाध्यक्ष शंकर पडुळकर यांनी तुर्भे एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांची सदिच्छा भेट घेऊन, त्यांना भारतीय संविधानाची प्रत दिली.
१४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम आदमी पक्ष नवी मुंबई कडून, भारतीय संविधानाची प्रत भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न अधुरे, फक्त केजरीवालच करतील पुरे, आम आदमी पक्ष हे एक संविधान प्रेमी, धर्म-जाती निरपेक्ष, निस्वार्थी आणि देशप्रेमी सामान्य नागरिकांचे संघटन आहे. आदरणीय बाबासाहेबानी लिहिलेले आपल्या देशाचे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देते. प्रत्येक चिमुकल्याला चांगल्या आणि मोफत शिक्षणाचा हक्क देते. प्रत्येक वयोवृद्धाला चांगल्या आणि मोफत आरोग्य सेवेचा हक्क देते.
पण दुर्देवाने, आज स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्षे उलटून सुध्दा, संविधानाने दिलेल्या ह्या हक्कानं बद्दल म्हणावी तशी जागरूकता जनते मध्ये आलेली नाही. त्याच प्रमाणे, आज काही मूठभर देशविघातक शक्तींकडून जाणून बुजून संविधानाची गळचेपी करण्याचे प्रयत्न होत आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी ह्या राष्ट्रीय पक्षातर्फे, विविध सरकारी पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून, संविधानाची प्रत भेट म्हणून देण्याचा उपक्रम चालू केला आहे.
आम आदमी पक्ष नवी मुंबई तर्फे भेट म्हणून देण्यात येणाऱ्या ह्या संविधान प्रतीचा स्वीकार करून अमल करावे असे मत तुर्भे नोडचे उपाध्यक्ष शंकर पडुळकर यांनी मत व्यक्त केले.
रिपोर्टर