मेस्मेरिक मिस मिसेस आणि मिस्टर इंडिया २०२३ सौंदर्य स्पर्धा दिमाखात संपन्न
- by Santosh Jadhav
- Apr 25, 2023
मेस्मेरिक मिस मिसेस आणि मिस्टर इंडिया २०२३ सौंदर्य स्पर्धा दिमाखात संपन्न
मेस्मेरिक मिस मिसेस अँड मिस्टर इंडिया २०२३ ( सीझन II ) ला प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर ह्यांची उपस्थिती
नवी मुंबई : मेस्मेरिक मिस मिसेस अँड मिस्टर इंडिया 2023 सीझन II सौंदर्य स्पर्धा एनसीआरडीच्या स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, नेरुळ येथे मोठ्या दिमाखात पार पडली. मेस्मेरिक मिस मिसेस अँड मिस्टर इंडिया २०२३ सीझन II ला प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर ह्या उपस्थिती होत्या. ही सौंदर्य स्पर्धा गुरमीत गारहाच्या ग्रूमिंग स्कूलने व्हायोलेट स्टुडिओच्या सहकार्याने आयोजित केली होती. ह्यामध्ये मिस, मिसेस प्रीमियम आणि क्लासिक आणि मिस्टर श्रेणीमध्ये घेण्यात आली होती. ग्रूमिंग एक्स्पर्ट गुरमीत गार्हा यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या स्पर्धकांनी अंतिम फेरीत आपल्या सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.
आयोजक आणि ग्रूमिंग एक्स्पर्ट गुरमीत गारहा ह्यांनी सांगितले की, "'मेस्मेरिक मिस मिसेस आणि मिस्टर इंडिया 2023' मध्ये आमच्या संपूर्ण टीमने आणि सर्व स्पर्धकांनी (सीझन II) च्या यशासाठी कठोर मेहनत घेतली. सौंदर्य स्पर्धा हे आपल्यामधील टॅलेंट आणि आत्मविश्वास जगाला दाखवण्यासाठी चे एक उत्तम व्यासपीठ आहे.
यावेळी डॉ. संजीव कुमार, अशोक मेहरा, चंद्राणी दास, मोनाली जगताप आणि गीता नागराज ह्या मान्यवरांनी 'जज' ची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली. 'मेस्मेरिक मिस मिसेस आणि मिस्टर इंडिया २०२३' सौंदर्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिया गरहा कोअर टीम-चेअरपर्सन , पाहुलदीप गारहा क्रिएटिव्ह डायरेक्टर , दिनेश राजपुरोहित (शो-डायरेक्टर), आयआयडीटी खारघरचे-डिझायनर, कुसुम गुप्ता , दिव्या जैन, कामखो डिझायनर स्टुडिओ, मंदार तांडेल फॅशन स्टायलिस्ट , डिझायनर एसडी फॅशन आणि अँकर रुषिकेश मिराजकर यांनी महत्वपूर्ण भुमीका बजावली.
'मेस्मेरिक मिस मिसेस आणि मिस्टर इंडिया २०२३' सौंदर्य स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ड्रीमझ मेकर्सच्या सौम्या सिंग आणि संस्थापक आय एम ओ डी ए आणि ए आय एफ ए, विकेश सिंग संस्थापक व्हायोलेट स्टुडिओ, डॉ. प्रशांत गुंडावार संचालक एन सी आर डी स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, कीर्ती कुमार संस्थापक वन गुड इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड आदी उपस्थित होते.
'मेस्मेरिक मिस मिसेस आणि मिस्टर इंडिया 2023' सौंदर्य स्पर्धेचे विजेते
मिसेस कॅटेगीरी ( क्लासीक)
विजेत्या - शोभा रामी .
पहीली उपविजेती- सतनाम सभरवाल.
दुसरी उपविजेती- निरुपमा भाटीया .
मिसेस कॅटेगीरी ( प्रीमियम)
विजेत्या - अरुणा बक्षी .
पहिल्या उपविजेत्या- मेघल शहा .
दुसऱ्या उपविजेत्या - नेहा नरसीअन .
मिस कॅटेगीरी
विजेत्या - उनत्ती साळवी
पहिल्या उपविजेत्या - यास्मीन खान .
दुसऱ्या उपविजेत्या - लगन ढाल .
मिस्टर कॅटेगीरी
विजेता- जितेश नायक
पहिला उपविजेता - तरुण दगर
दुसरा उपविजेता - रुषभ जाधव .
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav